बिहारमध्ये रविवारी ट्रक गर्दीत घुसल्याने १२ जण ठार झाल्याने खळबळ माजली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वैशाली जिल्ह्यातील मेहनार गावात ही दुर्घटना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताची दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात जखमी झालेल्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच जखमींना योग्य उपचार देण्याची सूचना करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्वीट करत दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ट्वीट

पोलिसांनी ट्रकचा चालक आणि हेल्पर या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच चालकाने मद्यप्राशन केलं होतं का याची माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पुण्यात भरधाव टँकरच्या धडकेत ४८ वाहनांचे नुकसान; ७ ते ८ जणांवर उपचार सुरू

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाचं नियंत्रण सुटले. टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.