scorecardresearch

DELHI: १२ वर्षीय मुलावर चौघांकडून बलात्कार, दिल्ली महिला आयोगाच्या तक्रारीनंतर एकाला अटक

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे

DELHI: १२ वर्षीय मुलावर चौघांकडून बलात्कार, दिल्ली महिला आयोगाच्या तक्रारीनंतर एकाला अटक
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १२ वर्षीय मुलावर चार जणांनी बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या मुलाला काठीने मारहाण केल्यानंतर मरणासन्न अवस्थेत सोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मलीवाल यांनी या घटनेबाबत ट्वीट केले आहे. “दिल्लीत आता मुलंही सुरक्षित नाहीत”, असे म्हणत या घटनेबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Ankita Bhandari Murder Case: फेसबूक फ्रेंडमुळे उलगडलं हत्येचं गूढ, धक्कादायक कारण आलं समोर

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. “दिल्लीत मुलींचे तर राहू द्या मुलेदेखील सुरक्षित नाहीत. १२ वर्षीय मुलावर चार नराधमांनी क्रृरपणे अत्याचार केला. काठीने मारहाण केल्यानंतर या मुलाला मरण्यासाठी सोडून देण्यात आले. या प्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली आहे”, असे मलीवाल यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघे अद्याप फरार आहेत. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणात पोलिसांना नोटीस बजावली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या