यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीच्या तब्बल १२५ घटनांची नोंद झाली आहे, ही गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी सांगितले. या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देशात नैऋत्य मान्सूनची उशिरा माघार आणि कमी दाब प्रणालीमुळे हे अतिवृष्टीमागचे मुख्य कारण आहे. IMD च्या आकडेवारीनुसार, यावर्षी सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक अतिवृष्टीच्या ८९ घटनांची नोंद झाली होती, तर गेल्या वर्षी याच महिन्यात ६१, २०१९ मध्ये ५९, २०१८ मध्ये ४४ आणि २०१७ मध्ये २९ घटना घडल्या होत्या.

२०२० मध्ये ऑक्टोबर महिन्यात १०, २०१९ मध्ये १६, २०१८ मध्ये १७ आणि २०१७ मध्ये १२ घटना घडल्या. यावर्षी ऑक्टोबरमध्ये अशा ३६ घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने सांगितले की, अतिवृष्टीच्या कारणांमध्ये प्रामुख्याने मान्सूनची उशिरा माघार, तसेच या काळात कमी दाबाची प्रणाली आणि ऑक्टोबरमध्ये पश्चिमेकडील कमी दाबाच्या पट्ट्यांचा समावेश आहे. परिणामी देशाला दोन चक्रीवादळे, सहा कमी दाबाच्या पट्ट्यांचा देशाला फटका बसला.

दरम्यान, राजधानी दिल्लीत मंगळवारी किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सोमवारी नोंदवलेल्या किमान तापमानापेक्षा सुमारे दोन अंश सेल्सिअसने जास्त आहे. सोमवारी किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस होते. दुसरीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी ‘अत्यंत खराब’ नोंदवला गेला आहे. सोमवारीही तो अत्यंत खराब श्रेणीत होता.