LPG Price Hike: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून आता घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. याआधी पेट्रोल आणि डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दूधाचा दर २ ते ५ रुपये प्रतिलीटर वाढवला होता. त्यामुळे ही वाढती महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला भार देत आहेत.

एलपीजी ५० रुपयांनी महागला

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. याआधी ६ ऑक्टोबर २०१९ ला हा दर वाढवण्यात आला होता. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. याआधी ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते.

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर

Petrol-Diesel Price Today: १३७ दिवसांनंतर देशात इंधनदरवाढ; जाणून घ्या कितीने महागलं पेट्रोल आणि डिझेल

मुंबईकरांना किती मोजावे लागणार?

आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही एलपीजीचा दर वाढला असून आता ८९९ रुपये ५ पैशांच्या जागी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. चेन्नईत हा दर ९६५ रुपये ५ पैशांवर आहे.

इतर शहरांची काय स्थिती?

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर वाढून ९७६ रुपये झाला आहे. याआधी हा दर ९२६ रुपये होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दर ९३८ वरुन थेट ९८७ रुपये ५ पैसे झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलही महागलं

देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच २२ मार्च २०२२ ला पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैशांवरुन वाढत प्रतिलीटर ९६ रुपये २१ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ८६ रुपये ६७ पैशांवरुन ८७ रुपये ४७ पैशांवर पोहोचला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.