स्वस्तात टॅटू काढूण घेणं पडलं महागात; एकच सुई वापरल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये १४ जणांना एचआयव्हीची लागण

प्रत्येक व्यक्तीने टॅटू काढण्यापूर्वी नवीन सुई वापरली जात आहे ना याबाबत खात्री करुन घेण्याचा सल्ला डॉ अग्रवाल यांनी दिला आहे.

स्वस्तात टॅटू काढूण घेणं पडलं महागात; एकच सुई वापरल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये १४ जणांना एचआयव्हीची लागण
संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये स्वस्तात टॅटू काढून घेणं १४ जणांच्या चांगलच अंगलट आलं आहे. टॅटू काढताना एकच सूई वापरल्यामुळे १४ जणांना एचआयव्हीची (HIV) लागण झाली आहे. या घटनेनंतर स्वस्त पार्लरमधून टॅटू काढून घेण्याबाबत अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक जखमी

तपासणीनंतर एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पण्ण

पंडित दिन दयाल रुग्णालयातील डॉक्टर प्रिती अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार टॅटू काढल्यानंतर १४ जणांना अचानक ताप आला. सुरुवातीला त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काही आढळून आले नाही. त्यानंतर त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सगळ्यांना एचआयव्हीची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या १४ जणांनी कोणतेही लैंगिक संबंध ठेवले नव्हेत किंवा कोणत्याही एचआयव्ही बाधित रुग्णाचे रक्त त्यांना चढवण्यात आले नव्हते.

हेही वाचा- क्युबात वीज कोसळून थेट ऑईल डेपोला आग, ८० जखमी, १७ बेपत्ता

पैसे वाचवण्यासाठी टॅटू कलाकारांकडून एकाच सुईचा वापर

या १४ जणांनी पैसे वाचवण्यासाठी ज्या स्वस्त पार्लरमधून टॅटू काढून घेतला होता. त्याने टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता. अग्रवाल यांच्या मते, टॅटूच्या सुया महाग असतात त्यामुळे टॅटू कलाकार पैसे वाचवण्यासाठी त्याच सुया वापरतात. प्रत्येक व्यक्तीने टॅटू काढण्यापूर्वी नवीन सुई वापरली जात आहे ना याबाबत खात्री करुन घेण्याचा सल्ला डॉ अग्रवाल यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 people test positive for hiv after getting tattoos in uttar pradesh dpj

Next Story
‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप; पगारातून कपात होणार ‘एवढे’ रुपये
फोटो गॅलरी