वर्णभेदभेदातून एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला जाळल्याचा प्रकार मेक्सिकोतील एका शाळेत घडला आहे. जॉन झामोरानो असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेत तो गंभीररित्या जळला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जॉन झामोरानोच्या जागेवर त्याच्याच वर्गातील दोघांनी ज्वलनशील प्रदार्था फेकले. त्यामुळे आपली कपडे ओले झाल्याचे लक्षात येताच तो आपल्या जागेवरून उभा राहिला. त्यानंतर त्यांच्या दोन मित्रांपैकी एकाने त्याच्या कपड्याला आग लावली.

हेही वाचा – VIRAL: बाईकवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, लोकांनी विचारले, “ऑफिसचे काम महत्वाचे आहे की जीवन?”

दरम्यान, जॉन हा लॅटीन अमेरिकेतील ओटोमी समाजातून येतो. त्यामुळे जॉनला त्याचे दोन्ही मित्र गेल्या काही आठवड्यापासून त्याच्या भाषेवरून त्रास देत होते, अशी माहिती जॉनच्या वकिलांनी दिली आहे. तसेच दोन्ही मित्रांविरोधात आणि शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

ओटोमी समाज हा लॅटिन अमेरिकेतील एक समाज आहे. या समाजाची लोकसंख्या जवळापास तीन लाखांच्यावर आहे.

हेही वाचा – राष्ट्रपती निवडणूक : “…तर चांगले झाले असते”, द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया