‘भाऊ वेळ लागेल’, बलात्कार आरोपींना अटक न केल्याच्या प्रश्नावर पोलिसांचं उत्तर

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला

संग्रहित छायाचित्र
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे अल्पवयीन मुलीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलगी लग्नातून घऱी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. घटनेला ४८ तास उलटूनही अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही असं विचारण्यात आलं असता पोलिसांना थोडा वेळ देणार की नाही ? असं अजब उत्तर देण्यात आलं.

मुलगी दुचाकीवरुन आपल्या भावासोबत घरी परतत असताना तिचं अपहरण कऱण्यात आलं होतं. आरोपींनी कारने दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पाडलं. यानंतर मुलीच्या भावाला मारहाण करत हात आणि पाय बांधून शेतात ढकलून दिलं. मुलीचं अपहरण करुन त्यांनी तिला कारमधून पळवलं. शोध घेतला असता 24 तासांनी घटनास्थळापासून तीन किमी अंतरावर मुलगी जखमी अवस्थेत सापडली होती.

मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केलं आणि माझ्याकडील 20 हजार रुपये लुटले. बुलंदशहर पोलीस आयुक्त ए कोलांची यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अद्याप मुलीला शुद्द आलेली नाही. तिच्याशी बोलल्यानंतर पुढील तपास करु शकणार आहोत. आम्ही लवकरच आरोपींना अटक करु. कारचा शोधही घेतला जात आहे’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 15 year old girl raped in up