२१ वर्षीय तरुणीला फरफटत नेत दगडाने वार अन् बलात्काराचा प्रयत्न; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने पोलीसही चक्रावले

मार्शल आर्ट ज्युडोचं प्रशिक्षण घेतलेल्या आरोपी तरुणाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झाडांमध्ये नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात बांधण्याचा प्रयत्न करताना दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

Kerala, Rape, बलात्कार,
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.

केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने २१ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी तरुणी कॉम्प्यूटर क्लाससाठी निघाली असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. मार्शल आर्ट ज्युडोचं प्रशिक्षण घेतलेल्या आरोपी तरुणाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झाडांमध्ये नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न करताना दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आरोपीपासून सुटका करुन घेत पळ काढला आणि जवळचं घर गाठलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आला. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.

“आम्ही पीडित तरुणीशी सविस्तर चर्चा केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचं चित्र रेखाटण्यात आलं. त्यानंतर तपास करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी केली,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी आणि तरुणी एकमेकांना ओळखत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तपास सध्या सुरु आहे. मात्र पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरु असून या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला काही वेळ लागणार आहे. त्यानंतर तपास पूर्ण होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 15 year old kerala boy dragged woman tried to choke rape her in kerala sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या