गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५ हजार ९६८ रुग्णांची वाढ झाली असून तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा प्रतिदिन रुग्णवाढ १५ हजारांपेक्षा जास्त झाली. शनिवारी दिवसभरात १५ हजार ४१३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
गेल्या चोवीस तासांमध्ये ४६५ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू १४ हजार ४७६ झाले आहेत तर एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ५६ हजार १८३ झाली आहे. करोनाचे २ लाख ५८ हजार ६८४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ५६.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १० हजार ४९५ रुग्ण बरे झाले. उपचाराधीन रुग्णसंख्या १ लाख ८३ हजार २२ इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा जास्त असून त्यातील फरक ७५ हजार ६६२ इतका आहे.
एका दिवसात २ लाख चाचण्या
गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात २ लाख १५ हजार १९५ नमुना चाचण्या घेऊन विक्रम नोंदवण्यात आला. प्रतिदिन सुमारे तीन लाख नमुना चाचण्या घेण्याची देशभरातील १ हजार क्षमता वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये आहे. आत्तापर्यंत ७३ लाख ५२ हजार ९११ नमुना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १ लाख ७१ हजार ५८७ चाचण्या सरकारी तर ४३ हजार ६०८ चाचण्या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत झाल्या. खासगी प्रयोगशाळांनीही प्रतिदिन चाचण्यांची क्षमता वाढवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
तृणमूल आमदाराचा मृत्यू
कोलकाता:तृणमूल चे आमदार तमोनाश घोष यांचे करोनामुळे निधन झाले.दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील फलता मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले होते.