मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडेंसह १७ खासदारांना करोनाची लागण

सगळ्या खासदारांची करण्यात आली होती करोना चाचणी

मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण १७ खासदारांना करोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह एकूण १७ जणांना करोनाची लागण झाली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या खासदारांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आज खासदारांनी अटेंडन्स अॅपद्वारे हजेरी लावली. तसंच त्यांना करोना किटही देण्यात आले. मास्क सॅनेटायझर देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचं आवरणही लावण्यात आलं आहे. एवढंच नाही तर उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. आज लोकसभेत ३५९ खासदारांची हजेरी होती. पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता.

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान आत्तापर्यंत ३७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तपर्यंत ७८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा देशभरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 17 mps including meenakshi lekhi anant kumar hegde test positive for covid 19 scj

ताज्या बातम्या