शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ, 'यूपी'तील घटनेचा धक्कादायक VIDEO | 17 years old girl naked dead body found in uttar pradesh Auraiya viral video rmm 97 | Loksatta

शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ, ‘यूपी’तील घटनेचा धक्कादायक VIDEO

उत्तर प्रदेशात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला आहे.

शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ, ‘यूपी’तील घटनेचा धक्कादायक VIDEO
फोटो- ट्विटर/@INCIndia

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला आहे. मृत मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर, पोलीस पथक तरुणीचा मृतदेह घटनास्थळावरून घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी कुटुंबातील काही लोक पोलिसांच्या पाठीमागे धावताना दिसत आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घाईघाईने मृतदेह ताब्यात घेऊन पळू लागले. गरीब कुटुंब मागे धावत आहे. महिलांवरील गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकावर आहे. पण याला कुणीही ‘जंगलराज’ म्हणणार नाही, अशा आशयाचं ट्वीट काँग्रेसनं केलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय आहे?
‘एशियानेट न्यूज हिंदी’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. येथील एका शेतकऱ्याची १७ वर्षीय मुलगी सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील शेतात शौच करण्यासाठी गेली होती. पण ती परत आलीच नाही. यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिचा शोध सुरू केला असता ती शेतात शौचास गेल्याचं समजलं. घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर बाजरीच्या शेतात मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला आहे. तिच्या गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर; कोण आहेत स्वांते पाबो? जाणून घ्या

संबंधित बातम्या

Gujarat Election Results 2022 Live : भाजपा ऐतिहासिक विजयाच्या दिशेने, १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता; वाचा प्रत्येक अपडेट
Himachal Pradesh Election Results 2022 Live : भाजपा-काँग्रेसमध्ये रस्सीखेच, ३ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर
World’s Richest Person: एलॉन मस्क यांची मत्तेदारी मोडीत; ‘या’ व्यक्तीने पहिल्या स्थानावर घेतली उडी
“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा”, आफताबचं पोलिसांना खुलं आव्हान, खूनाचं कारणही सांगितलं
Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये हालचालींना वेग; विनोद तावडेंवर बेरजेच्या गणिताची जबाबदारी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता! प्राथमिक निकालानंतर राजनाथ सिंह यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले “विजयाचे आम्हाला नवल नाही, कारण…”
पुणे : १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के तरुणांची मतदार नोंदणी नाही; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती
पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी
Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट
“तुम्ही निर्लज्ज…” जेव्हा नीना गुप्ता यांच्या मित्रानेच चित्रपटात घेण्यास दिला होता नकार