काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले आहेत, असे वृत्त माध्यमांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.  ही घटना काबूलमधील लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली आहे. 

  सरदार मोहम्मद दाऊद खान लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला, असे तालिबान संचालित अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती यांनी ट्वीटमध्ये संदेशात म्हटले आहे. विशेष दल घटनास्थळी असल्याचे त्यांनी सांगितले. गोळीबाराच्या आवाजासह काबूलच्या १० व्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलच्या परिसरात दोन स्फोट झाल्याचे शहरातील रहिवाशांनी सांगितले.  या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणी स्वीकारलेली नाही.

 गेल्या काही दिवसांत, इस्लामिक स्टेट गटाच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबार केले आहेत. इस्लामिक स्टेट हा तालिबानचा प्रतिस्पर्धी आहे आणि ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून त्यांनी देशभरात हल्ले वाढवले आहेत.