वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाने संरक्षणतंत्रज्ञान, राजकारणी आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलला लक्ष्य करणाऱ्या चार भारतीय हेरांची गुपचूप हकालपट्टी केल्याचे सार्वजनिक प्रसारण संस्था ‘एबीसी’च्या तपासात आढळून आले आहे. २०२० मध्ये भारतीय हेरांच्या कारवायांचा शोध घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताने बाह्य मजबूत राजनैतिक आणि व्यापारी संबंधांवर जोर दिला.भारतीय हेर संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून राजकारणी तसेच पोलीस सेवा, भारतीय ऑस्ट्रेलियन नागरिकांवरही लक्ष ठेवले जात होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 indian spies expelled from australia amy
First published on: 20-06-2024 at 06:55 IST