भरधाव पोर्श वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशातही एका भरधाव फॉर्च्युनर गाडीने दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. धक्कादायक म्हणजे ही फॉर्च्युनर गाडी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पूत्र करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील आहे. त्यामुळे या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजपचे कैसरगंज लोकसभा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. गोंडा येथील कर्नलगंज-हुजूरपूर रस्त्यावरील बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला.

27 female students were illegally kept on rent in the girls hostel of Government Engineering College Chandrapur
कमालच आहे राव… प्राध्यापिकांनी वसतिगृहात चक्क २७ विद्यार्थिनींना भाड्याने ठेवले
college girl, sexually abused,
नाशिक: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन बदनामीची धमकी, सिडकोतील घटना
Poor management of Savitribai Phule Hospital of Municipal Corporation in Kolhapur
कोल्हापुरात महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा बेभरवशी कारभार; तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करणार
suicide in goregao
मुंबईत पीएचडीधारकाचा मैत्रिणीच्या घरी संशयास्पद मृत्यू; पंख्याला लटकलेल्या मृतदेहावर रक्तस्राव कसा झाला?
6th class student died due to dizziness in nashik
सहावीतील विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू
thane, Stray Dog Found Suspicious Dead in thane, Case Filed After Stray Dog Found Dead, Animal Lovers Suspect Poisoning or Beating dog in thane, dog suspicious dead in thane, thane news, animal lovers,
भटक्या श्वानाचा संशयास्पद मृत्यू, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
alibag 4 students drowned marathi news,
रायगड : रिझवी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, खालापूर तालुक्यातील वावर्ले येथील घटना
Vidyaniketan school in Dombivali was closed for the afternoon session due to Heavy traffic
वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतल्या विद्यानिकेतन शाळेला दुपारच्या सत्रात सुट्टी, राजू पाटील म्हणाले, “ही बाब लज्जास्पद”

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चंदा बेगम यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिचा १७ वर्षांचा मुलगा रेहान आणि २४ वर्षांचा पुतण्या शहजादे हे दोघे दुचाकीवरून निघाले असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या फॉर्च्युनरने दोघांना धडक दिली. दोघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि आणखी एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी कार जप्त केली असून चालकाला अटक केली आहे. करण भूषण सिंह या ताफ्यातून प्रवास करत होते की नाही याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. करण भूषण सिंह हे कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. ब्रिज भूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी फौजदारी आरोप असल्याने त्यांनी त्यांचे वडील आणि विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची जागा घेतली.

याप्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर, या घटनेतर गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून पोलिसांविरोधात ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. तरुणांकडून चक्काजाम करण्यात आला असून पोस्टर्माटम रोखताना पोलीस आणि जमावात बाचाबाची झाली.