Tamil Nadu Crime News : तमिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन शाळकरी मुली आणि एका मुलावर पाच किशोरवयीन मुलांनी बलात्कार केला आहे. आरोपींपैकी चार जण हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यांसंबंधीचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि एका १८ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओदेखील बनवला होता. पोलिसांना या भीषण कृत्याचे व्हिडीओ देखील मिळाले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये या चार अल्पवयीन आरोपींनी गावाबाहेरील परिसरात शाळकरी मुलांवर पाच वेळा बलात्कार केल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सर्व आरोपींनी शाळा सोडून दिलेली असून ते मजूरी करतात.

मिडिया रिपोर्टानुसार, आरोपी त्यांच्या मोबाईलवर पॉर्न पाहायचे. तसेच लैंगिक अत्याचारास विरोध केल्यावर पाचही आरोपी शाळकरी मुलांना काटेरी झुडुपाने मारहाण करायचे. हे पीडित विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबियांना या प्रकाराबद्दल शुक्रवारी सकाळी समजले. विशेष म्हणजे, या शाळकरी मुलांचे कुटुंबिय या प्रकरणात तक्रार दाखल करू इच्छित नव्हते.

एक आरोपी अद्याप फरार

मात्र गावकऱ्यांना तात्काळ चाइल्डलाइन (१०९८) वर संपर्क साधला आणि प्रकरण सांगितले. यानंतर महिला पोलि‍सांनी चार अल्पवयीन मुले आणि एका तरूणावर पोक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांच्या अंतर्गत गु्न्हा दाखल केला. शुक्रवारी सायंकाळी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि १८ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली. पाचवा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे.

तीन अल्पवयीन आरोपींना कोइम्बतूर शहरातील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.तर १८ वर्षीय तरुणाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि सध्या तो कोइम्बतूर मध्यवर्ती कारागृहात आहे. तसेच पाचव्या आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader