दिल्लीत मुंडका परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन मित्रांत तुफान हाणामारी झाली आहे. हा वाद एवढा विकोपाला गेला की, यातील एकाने दुसऱ्या मित्रावर चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवरही चाकुहल्ला करण्यात आला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ८ मार्चला दुपारी १.३६, १.४२ आणि १.४७ ला मुंडका परिसरातील गल्ली क्रमांक ७ मधील घर क्र. डी-१५ए मध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली.

trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

हेही वाचा : दगड, विटा अन् दांडक्याने बेदम मारहाण; कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून जीम ट्रेनरचा निर्घृण खून, कारण वाचून बसेल धक्का!

घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना माहिती मिळाली की, डी-१५ ए या घरात राहत असलेल्या सोनूचा शेजारील गल्ली क्र. १४ मध्ये राहत असलेला मित्र अभिषेकबरोबर वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी केल्यावर अभिषेकने त्यांच्यावरही चाकुने हल्ला केला.

हेही वाचा : …अन् दोन सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; दिल्लीत ५ मजली इमारत कोसळली, थरकाप उडवणारा VIDEO

या घटनेत सात लोक गंभीर जखमी झाले होते. ज्यांना आनन-फानन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी सोनू आणि नवीन नावाच्या व्यक्तीला मृत घोषित केलं. तर, लोकांनी चोप दिल्याने अभिषेकही जखमी झाला आहे. त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं आहे. तर, अन्य एक गंभीर असून, तीन जणांची परिस्थिती स्थिर आहे.