पीटीआय, मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या गुएरेरो राज्यात बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात शहराचे महापौर आणि त्यांच्या वडिलांसह २० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सॅन मिगुल तोतोलापान शहरातील एका सभागृहात कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी काही हल्लेखोरांनी व्यासपीठाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यात शहराचे महापौर कोर्नाडो मेंडोसा अल्मेडा, माजी महापौर असलेले त्यांचे वडील आणि अन्य १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ‘लॉस टकिलेरोस’ या टोळीने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. हल्ल्यापूर्वी या टोळीच्या सदस्यांनी आपण गुएरेरोमध्ये परतल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकली होती. म्होरक्या ठार झाल्यानंतर गेली ५-६ वर्षे ही टोळी निष्क्रिय होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापौर लक्ष्य

मेक्सिकोचे विद्यमान अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांच्या कार्यकाळात आतापर्यंत १८ महापौर आणि आठ लोकप्रतिनिधींची हत्या झाली आहे. सुरक्षेसाठी लोपेझ ओब्राडोर यांची भिस्त लष्करावर असून त्यामुळे स्थानिक पोलिसांचे पंख छाटले गेल्याचा आरोप होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 people including mayor shot dead attackers in mexico ysh
First published on: 07-10-2022 at 00:02 IST