20 US states sue Donald Trump administration : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा ते असेच चर्चेत आले असून अमेरिकेतील कॅलिफॉर्निया आणि इतर १९ राज्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे. फेडरल प्रायव्हसी कायद्यांचे उल्लंघन करत ट्रम्प प्रशासनाने लाखो नोंदणी केलेल्या लोकांचा मेडिकेड डेटा (वैद्यकीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांचा डेटा) डिपोर्टेशन अधिकाऱ्यांना दिल्या प्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.
हेल्थ सेक्रेटरी रॉबर्ट एफ केनडी जुनियर यांच्या सल्लागारांनी गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया, इलिनॉय, वॉशिंग्टन येथील लोकांची आरोग्यासंबंधीची खाजगी माहिती असलेला डेटासेट होमलँड डिपार्टमेंटला जारी करण्याचे आदेश दिले होते, एपी या वृत्तसंस्थेने यासंबंधीची वृत्त दिले आहे. येथील कायद्यांनुसार नागरिक नसलेल्या लोकांना मेडिकेड (Medicaid) प्रोग्राममध्ये नावे नोंदवता येतात, ज्यानुसार राज्याच्या करदात्यांनी पैशांवर त्यांचा खर्च उचलला जातो.
नेमका आरोप काय आहे?
ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीरपणे संवेदनशील, खाजगी डेटा आयसीई बरोबर शेअर करण्याच्या निर्णय घेऊन गोपनियतेला दीर्घकाळापासून देण्यात आलेले संरक्षण संपवले आहे, असे कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल रॉब बोंटा हे त्याच्या निवेदनात म्हणाले आहेत. तसेच असे केल्याने, एक भीतीची संस्कृती तयार केली आहे, ज्यामुळे पुढे जाऊन कमीत कमी लोक आवश्यक अशी आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेतील, असे बोंटा यांच्या निवदेनात पुढे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून शेअर करण्यात आलेल्या डेटामध्ये नावे, पत्ता, सोशल सेक्युरिटी नंबर, इमिग्रेशनची स्थिती आणि मेडिकल क्लेम्स यांचा समावेश आहे.
आरोग्य आणि ह्युमन सर्व्हिस विभागाचे प्रवक्ते अॅन्ड्रू निक्सन यांनी मात्र प्रशासनाच्या निर्णयाचा बचाव केला आहे. हा निर्णय सर्व कायद्याचे पालन करत देण्यात आल्याचे ते म्हणाले आहेत.
कॅलिफोर्नियाने गेल्या महिन्यात अनेक वेळा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात खटले दाखल केले आहेत. ज्यामध्ये १२ जून रोजी कॅलिफोर्नियाने अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतलेला राज्यातील टेलपाइप इमिशन नियम रद्द करण्याचा निर्णय आणि गॅस-पॉवर्ड कार बंद करण्याच्या मोहिमेविरोधात देखील ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला होता.
तसेच याच्या दोन दिवसांपूर्वीच कॅलिफोर्नियाने ट्रान्सजेंडर हायस्कूल खेळाडूंना महिलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या राज्यातील कायद्यामुळे फेडरल फंडिंग रोखली जाण्याच्या धोक्यापासून बचावासाठी ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे.
त्याच वेळी, इमिग्रेशन छाप्यांवर व्यापक निदर्शने होत असताना लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल केला.
तसेच यात काळात कॅलिफोर्नियाने इमिग्रेशन रेड्सच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लॉस एंजेलिस येथे नॅशनल गार्ड तैनात केल्याप्रकरमी देखील ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल केला आहे.