भारताचा अमेरिका इराण युद्धात थेट सहभाग नसला तरी त्याचे चटके भारताला बसत आहेत. अत्यंत धोकादायक परिस्थितीत, इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये न फुटलेलं क्षेपणास्त्र नौदलाने निकामी केलं आहे. एमटी ऑलिम्पिक लाईफ असं या टँकरचं नाव आहे. ओमानहून हे जहाज कोचीच्या दिशेने आलं. प्रवासादरम्यान हे जहाज युद्धजन्य प्रदेशातून आलं. त्यावेळा हे क्षेपणास्त्र आदळलं.

हे क्षेपणास्त्र जरी फुटलं नाही तर संवेदनशील ज्वालाग्राही पदार्थांची नेआण करणाऱ्या जहाजावर त्याचं असणं म्हणजे जिवंत बॉम्बच होता. हा धोका लक्षात येताच नौदलाने हे क्षेपणास्त्र निकामी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. ओमानहून निघाल्यापासून या जहाजाने २००० किलोमीटरचा पल्ला पार केला होता.

क्षेपणास्त्र जहाजाच्या मुख्य भागावर आदळलं. तिथून ते अन्य भागात विखुरलं गेलं. त्यानंतर ते इंधनांची टाकी असलेल्या जाऊन अडकलं. अरबी समुद्र पार करून हे जहाज कोचीत दाखल झालं. जहाजावर इंधनासारखा ज्वालाग्राही सामुग्री होती. क्षेपणास्त्र अनियंत्रित पद्धतीने फुटलं असतं तर जीवितहानी झाली असती. यामुळेच नौदलाच्या एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोझल या तुकडीने मोहीम हाती घेतली. बचाव अभियानात स्फोटक निवारण तज्ज्ञांनी क्षेपणास्त्राच्या स्फोटकांपासून स्फोट घडवणारी यंत्रणा विलग केली. यामुळे जहाजावर स्फोट झाला नाही.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात यासंदर्भात माहिती दिली. क्षेपणास्त्र जहाजाच्या विविध भागात अडकून राहिल्याने ते कधीही फुटण्याचा धोका होता. तसं झालं असतं तर जीवितहानी झाली असती. ज्वालाग्राही इंधन असल्यामुळे आगही लागू शकली असती. नौदलाने हे सगळं

अतिशय काटेकोरपणे या मोहिमेची आखणी करण्यात आली आणि धोका लक्षात घेऊन काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यात आली. अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतून भारतात इंधन घेऊन येणाऱ्या जहाजांना मोठा फटका बसला आहे. अनेकदा ही जहाजं दोन्ही देशांच्या लष्करी आक्रमणाचं लक्ष्य ठरत आहेत. क्षेपणास्त्रं, ड्रोन तसंच समुद्री हल्ले यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. ९ जूनपासून भारताच्या तीन जहाजांना अमेरिकेच्या आक्रमणाचा फटका बसला आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून जहाज कंपन्यांना या भागातून इंधनसारख्या ज्वालाग्राही घटकाची वाहतूक करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. विविध देशांच्या नौदलांनी बंद केलेले मार्ग तसंच वाढणारी विमा रक्कम यामुळेही नुकसान होत आहे. एमटी ऑलिम्पिक लाईफ जहाज गल्फ ऑफ ओमान या भागातून जात असताना त्याच्यावर क्षेपणास्त्राचा मारा झाला. युद्धामुळे हा भाग अत्यंत संवेदनशील टापू झाला आहे. जागतिक पातळीवर इंधनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा भाग भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे.

एकीकडे शांतता करार लागू होण्याची चिन्हं असताना दुसरीकडे भारतीय जहाजं आणि पर्यायाने त्यावर काम करणारे भारतीय नागरिक आक्रमणांना बळी पडत आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. अशी आक्रमणं बेकायदेशीर आणि जागतिक समुद्री व्यापार वाहतुकीसाठी धोकादायक आहेत असं जाणकारांचं म्हणणं आहे.