Indian students in Canada : कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. यादरम्यान इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा यांच्या रिपोर्टनुसार मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये कॅनडाचे महाविद्यालय किंवा विद्यापीठात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा एकूण ५०,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी २०,००० विद्यार्थी हे भारतीय आहेत.

एकंदरीत स्टडी परमीट दिले गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी विद्यालयात रूजू न होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ६.९ टक्के इतकी आहे.

US Air Force C-17 A Globemaster III
लष्करी विमानातून भारतीय स्थलांतरितांना मायदेशी धाडण्यात अमेरिकेने किती खर्च केला?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
illegal Indian deportees Amritsar
US Deported Indians : “त्यांनी कितीतरी दिवसांपासून गरम जेवण…”, अमृतसर विमानतळावरील अधिकार्‍यांनी सांगितली अमेरिकेतून आलेल्या भारतीयांची स्थिती
US Illegal Immigrants deported
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा
Amritsar Airport
Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणारे शेकडो भारतीय स्वगृही परतले, महाराष्ट्रातील तीन नागरिकांचाही समावेश!
Guidance for 10th-12th students State Board appoints counsellors
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
Indian Migrants in America
Indian Migrants : अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीयांची लष्करी विमानानं ‘घर’वापसी
Nijjar killing
“खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग नाही”, कॅनडाच्या अहवालातील निष्कर्ष!

इंटरनॅशनल स्टूडंट कम्पायन्स रिजीम अंतर्गत ही आकडेवारी गोळा केली गेली आहे. ज्यामध्ये अभ्यास परवान्यांसंबंधी (study permits) नियमांचे पालन केले जात असल्याचे निश्चित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना वर्षातून दोनदा नावनोंदणीचा ​​अहवाल द्यावा लागतो.

या रिपोर्टनुसार १४४ देशातील विद्यार्थ्यांचा मागोवा घेण्यात आला, ज्यानुसार वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये रुजू होण्याचे वेगवेगळे आहेत. जसेच की ६६८ विद्यार्थी (२.२ टक्के) हे फिलीपिन्स येथील आहेत आणि ४,२७९ (६.४ टक्के) विद्यार्थी हे चीनमधील आहेत जे प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेत रूजू झाले नाहीत. इराणमधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा दर खूपच जास्त (११.६ टक्के) आहे. रवांडाचे तब्बल ४८.१ टक्के विद्यार्थी प्रवेश मिळालेल्या शैक्षणिक संस्थेत रूजू झाले नाहीत.

भारतीय तपास यंत्रणांकडून कॅनडामधून अमेरिकेत अवैधरित्या स्थलांतर करण्यास मदत केल्या प्रकरणी कॅनडा येथील शैक्षणिक संस्था आणि भारतातील काही लोकांच्या संबंधांचा तपास सुरू केला आहे. काही भारतीय विद्यार्थ्यानी स्टडी परमीट घेऊन कॅनडाला गेलेल्या काही विद्यार्थ्यांनी अवैधपणे अमेरिकेत घुसखोरी केल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारामुळे प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

माजी फेडरल इकॉनॉमिस्ट आणि इमिग्रेशन विषयातील तज्ञ हेन्री लोटिन यांनी द ग्लोब आणि मेलशी बोलताना सांगितले की, बहुतेक शैक्षणिक संस्थांमध्ये रूजू न झालेले भारतीय विद्यार्थी कॅनडामध्येच राहिले आहेत. तसेच ते कायमस्वरूपी कॅनडामध्ये राहण्याचे लक्ष्य ठेवून काम करत राहातात.

Story img Loader