पीटीआय, पोर्ट ब्लेअर

‘‘पूर्वीच्या सरकारांच्या विकृत वैचारिक राजकारणामुळे आत्मविश्वासाचा अभाव व हीन भावनेतून देशाच्या सामथ्र्य व क्षमतेस कमी लेखले गेले. हिमालयीन दुर्गम प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि देशाच्या बेटांना ‘दुर्गम व अप्रस्तुत’ मानून पूर्वीच्या सरकारांनी त्यांना अनेक दशके उपेक्षित ठेवले. त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांच्या २१ सर्वात मोठय़ा बेटांना परमवीर चक्र विजेत्या सुरक्षादल अधिकाऱ्यांचे नाव देण्यात आले. या प्रसंगी मोदी बोलत होते.दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर उभारण्यात येणाऱ्या नेताजी राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान, तीन संरक्षण दलांचे प्रमुख, अंदमान-निकोबार बेटांचे नायब राज्यपाल देवेंद्रकुमार जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेताजींसारख्या महान नायकाला विसरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. दिल्लीतील ‘इंडिया गेट’ येथे नेताजींचा पुतळा उभारणे, आझाद हिंदू सरकारच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज वंदन, नेताजींच्या जीवनाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करणे आदी नेताजींच्या स्मरणार्थ उचललेल्या पावलांचा उल्लेखही मोदींनी यावेळी केला. ते म्हणाले, की ज्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यानंतर विसरण्याचा प्रयत्न केला गेला, आज देश प्रत्येक क्षणी त्यांचे कृतार्थ स्मरण करत आहे.
पंतप्रधान म्हणाले, की पूर्वीच्या सरकारांच्या विकृत वैचारिक राजकारणामुळे आपल्या देशाची क्षमता नेहमीच कमी लेखण्यात आली होती. या विचारसरणीमुळे दुर्गम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश व देशाची बेटे अनेक दशके दुर्लक्षित राहिली. अंदमान-निकोबार बेटेही याचे साक्षीदार आहेत. सिंगापूर, मालदीव आणि सेशेल्सची उदाहरणे देत पंतप्रधान म्हणाले, की या देशांनी त्यांच्या संसाधनांचा योग्य वापर केल्यामुळे हे देश व बेट प्रदेश पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. भारतातील बेटांमध्येही अशीच पर्यटन क्षमता आहे. ती जागतिक आकर्षण केंद्र होऊ शकतात.

‘पर्यटनामुळे विकासाला नवी गती !’
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित स्मृतिस्थळे व इतर प्रेरणास्थळे अंदमान-निकोबार येथे येण्यासाठी देशवासीयांत उत्सुकता निर्माण करत आहेत. आगामी काळात येथे पर्यटनाच्या अधिक संधी निर्माण होतील. या बेट समूहातील इंटरनेट सेवांच्या विस्ताराचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, की, पूर्वी अंदमान-निकोबार बेटांनी स्वातंत्र्यलढय़ाला नवी दिशा दिली होती. भविष्यातही ही बेटे देशाच्या विकासाला नवी गती देतील.