वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अदानी समूहावरील कर्जाचा बोजा मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. यात आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचे प्रमाण वाढून एक तृतीयांश पातळीवर गेले आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे.

समूहाच्या निव्वळ कर्जाचे कंपन्यांच्या एकत्रित व्याज, कर व घसारापूर्व उत्पन्नाशी गुणोत्तर मागील आर्थिक वर्षांत ३.२ टक्के होते. हे प्रमाण सप्टेंबर २०१३ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ७.६ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय घसरले आहे. अदानी समूहातील प्रमुख सात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्चअखेर वार्षिक तुलनेत २०.७ टक्क्यांनी वाढून २.३ लाख कोटी रुपयांवर (२८ अब्ज डॉलर) पोहोचले आहे. समूहावरील कर्जाचा बोजा २०१९ पासून सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो कमी करण्यासाठी समूहाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. तथापि समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही वाढल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वित्तपुरवठा आणि त्याचा स्रोत अर्थात कर्जदाते यात कशा पद्धतीने बदल केला, हे आकडेवारीतून स्पष्ट होते. समूहातील माहितगार सूत्रांनी दिलेली माहिती आणि गुंतवणूकदारांसमोर कंपन्यांनी केलेले सादरीकरण यातून ही मार्च २०२३ अखेरची ही आकडेवारी समोर आली आहे. अदानी समूहावरील कर्जामध्ये आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचा वाटा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अदानी समूहाच्या कर्जदात्यांच्या यादीत सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बँका ही वर्गवारीच नव्हती.

अदानी समूहाने गुजरात राज्यातून आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करीत ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल यासारख्या देशांमध्ये व्यवसाय विस्तार केला. परंतु, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला धक्का बसला आहे. समूहाचे अनेक व्यवसाय आता नियामक यंत्रणांच्या रडारखाली आले आहेत. अदानी समूहाचे वरिष्ठ अधिकारी गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान करीत आहेत. समूह कर्जाची परतफेड करीत असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी समूहातील कंपन्यांचे समभाग व डॉलरमधील रोखे यांचे मूल्य अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. कर्जाचे गुणोत्तर सुधारण्यासाठी कंपन्यांकडून निधी उभारणी केली जाऊ शकते.