scorecardresearch

होळी खेळताना जपानी तरूणीशी तरूणांचं अश्लील वर्तन, दिल्ली पोलिसांचं जपान दुतावासाला पत्र

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी जपानी दुतावासाला इमेल केला आहे

22 year old Japanese woman harassed by men on Holi goes to Bangladesh, shares tweet
जाणून घ्या नेमकी काय घडली घटना?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये काही मुलं ही एका जपानी तरूणीशी अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. होळी खेळण्याच्या नावाखाली हे वर्तन केलं गेलं आहे.हा व्हिडिओ दिल्लीतल्या पहाडगंज भागातला आहे असं सांगण्यात येतं आहे. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी जपान दुतावासाला पत्र लिहिल्याचीही माहिती समोर आली आहे.

जपानी दुतावासाला दिल्ली पोलिसांनी लिहिलं पत्र

डीसीपी ऑफिसद्वारे हे सांगण्यात आलं की @iramsubramanian या हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या बाबतची पुष्टी करणं अद्याप बाकी आहे की नेमका काय प्रकार झाला. मात्र या व्हिडिओमध्ये जपानी मुलगी आपल्यासोबत काय घडलं ते सांगताना दिसते आहे. जपानी तरूणीची ओळख, तिचं नाव आणि इतर सगळे तपशील घेण्यात आले आहेत आणि तिच्याविषयी जपानी दुतावासाला आम्ही मेल केला आहे असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.

जपानहून होळी खेळण्यासाठी दिल्लीत आली होती तरूणी

भारतात ही तरूणी होळी खेळण्यासाठी खास जपानहून आळी होती.जो व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आणि व्हायरल होतोय त्यावर काँग्रेस नेत्या पंखुडी पाठक यांनीही रिप्लाय दिला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबीयांसोबत एखाद्या सणाचा, उत्सवाचा आनंद घेण्यासाठी जाता तेव्हा चहुबाजूंनी फक्त तुम्हाला आनंदच मिळवायचा असतो. मात्र हा व्हिडिओ किती भयंकर आहे. वास्तवात दोन भारत आहेत का? एक संस्कृती जपतोय असं दाखवणारा आणि दुसरा इतका भेसूर. या व्हिडिओत दिसणारे पुरूष पुरुष जातीला कलंक आहेत असंही पाठक यांनी म्हटलं आहे.

अँटी रेप अॅक्टिव्हिस्ट योगीता भयाना यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. मला समजत नाही की या मुलांवर त्यांचे आई वडील नेमके कोणते संस्कार करतात? या मुलांनी जपानी तरूणीशी केलेलं वर्तन हे अत्यंत घृणास्पद आहे असंही योगिता भयाना यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओवर इतरही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. होळीच्या माध्यमातून ही फक्त दुसऱ्या देशातून उत्सवासाठी आलेल्या पाहुण्या मुलीच्या छेडछाडीची ही घटना आहे. या तरूणांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. होळी हा प्रेमाच उत्सव आहे. मात्र या तरूणांनी या उत्सवाला गालबोट लावलं आहे असंही काही युजर्स म्हणत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 10:54 IST