Spanish Tourist girl gored to death While bathing elephant : जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या थायलंडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. स्पेनच्या एक २२ वर्षीय तरूणी ब्लँका ओजंगुरेन गार्सिया (Blanca Ojanguren Garcia) ही तिच्या मित्राबरोबर दक्षिण-पश्चिम थायलंडला फिरायला गेली होती. यादरम्यान हत्तीला आंघोळ घालताना हत्तीने केलेल्या हल्यात या तरूणीचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, गार्सिया ही इतर पर्यटकांप्रमाणे दक्षिण-पश्चिम थायलंडमधील कोह याओ एलिफंट केयर सेंटरमध्ये हत्तींबरोबर वेळ घालवण्यासाठी गेली होती. येथे हत्तीला आंघोळ घालताना तिला हत्ती आपल्यावर हल्ला करू शकतो याची कल्पना नव्हती. हत्तीने तिच्यावर सुळ्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीरपणे जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Crocodile Fight With Baby Elephant
बापरे! पाणी पिणाऱ्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला; अवघ्या ५ सेकंदात भयंकर घडलं, शेवटी मृत्यूच्या खेळात कोण जिंकलं?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Man Jumped From The Second Floor To Save His Life From An Elephant Attack
बापरे! पिसाळलेल्या हत्तीनं हलवली ३ मजली इमारत; घाबरलेल्या तरुणांनी चक्क दुसऱ्या मजल्यावरून मारल्या उड्या, थरारक VIDEO
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Forest department ignorance about elephant capture campaign in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती पकड मोहिमेबद्दल वनविभाग उदासीन; १० फेब्रुवारी पासून साखळी उपोषण
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
14 year old school boy committed suicide by shooting himself in head with his fathers revolver at Adhegaon in Madha taluka
शाळकरी मुलाची गोळी झाडून आत्महत्या

ही घटना घडली तेव्हा तिचा बॉयफ्रेंडदेखील उपस्थित होता. पण या हल्ल्यात त्याला काही इजा झाली की नाही? याबद्दल माहिती मिळू शकली नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते हत्तीने तणावातून तरुणीवर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे हा तणाव आला असू शकतो असे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार गार्सिया नॉर्थवेस्ट स्पेनमध्ये वेलाडोलिड शहरातील रहिवासी होती. गार्सिया स्पेनच्याच पॅम्प्लोना येथे यूनिव्हर्सिटी ऑफ नवरा येथे शिक्षण घेत होती. कायदा आणि इंटरनॅशनल रिलेशनचे शिक्षण घेणारी गार्सिया पाचव्या वर्षात शिकत होती. तिने काही दिवसांपूर्वीच यूनिव्हर्सिटीच्या एक्सचेंज प्रोग्राममध्ये भाग घेतला होता. या अंतर्गत ती तैवानच्या एका विद्यापीठात गेली होती. गार्सियाबरोबर झालेल्या दुर्घटनेनंतर तिच्या विद्यापीठाने निवेदन जारी करत त्याबद्दल दुख: व्यक्त केले आहे.

हेही वाचा>> राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”

थायलंडमध्ये हत्तींपासून दूर राहा

थायलंडमध्ये हत्तींची संख्या खूपच जास्त आहे. येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हत्ती एक आकर्षणाचे केंद्र असतात. थायलंडमध्ये हत्तींचे शो देखील आयोजित केले जातात. विशेष बाब म्हणजे थायलंडमध्ये ४००० हून अधिक जंगली हत्ती आहेत, जे येथील जंगलात राहातात. याव्यतिरिक्त ४००० हून अधिक पाळलेले हत्ती देखील आहेत ज्यांचावार पर्यंटकांसाठी केला जातो. थायलंडच्या राष्ट्रीय उद्यान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील १२ वर्षात थायलंडमध्ये जंगली हत्तींनी केलेल्या हल्ल्यात २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ३९ जणांचा मृत्यू गेल्या वर्षभरात झाला आहे.

Story img Loader