22 year old women gangrape by six men in jharkhand spb 94 | Loksatta

पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार; सहा जणांना अटक

एका २२ वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे.

पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार; सहा जणांना अटक
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

झारखंडच्या पलारना जिल्ह्यात एका २२ वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकणातील सहाही आरोपींना अटक केली आहे. पलारनाचे पोलीस अधिक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला आदेश देत सांगितलं “लवकरात लवकर…”

सासरी झालेला भांडणाचा राग मनात धरत ही महिला रविवारी रात्री घरातून पायी आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली होती. तिचा नवरा आणि त्याचा एक नातेवाईक महिलेचा शोध घेण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. दरम्यान, त्यांना ती राष्ट्रीय महामार्ग ३९ वरून चालत जाताना आढळली. ते दोघेही तिला घरी परतण्यासाठी विनंती करत असताना सहा जण तेथे आले. त्यांनी महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकाला जबर मारहण केली. तसेच त्यांना निर्जन स्थळी नेऊन पतीसमोर महिलेवर बलात्कार केला.

हेही वाचा – पुणे : खासगी महाविद्यालयांनी शुल्क कमी करा, आम्ही प्राध्यापकांचे वेतन देतो ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका

पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींपैकी दोन आरोपी त्याच्या ओळखीचे होते. दरम्यान, त्यांनी केलेल्या मारहाणीत तो जबर जखमी झाला होता आणि त्याचा नातेवाईक बेशुद्ध पडला होता. यावेळी आरोपींनी महिलेला मोटारसायकलवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोडं पुढे जाताच ती मोटारसायकल समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला धडकली आणि महिलेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थ तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले. तर उर्वरित चार आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. दरम्यान, महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2022 at 19:50 IST
Next Story
Ankita Bhandari Murder : “…तर आरोपींना आमच्या घरासमोर जिवंत जाळा”, अकिंताच्या आईची सरकारकडे मागणी