Mom Burned One Month Baby In Oven: बाळ कितीही मोठं झालं तरी आईसाठी लहानच असं म्हणतात. जरा कुठे आपल्या बाळाला दुखलं- खुपलं तर आईचा जीव किती कळवळतो हे शब्दात मांडता येणार नाही. असं असलं तरी कधी कधी बाळाच्या बाबत आईच्या हातूनही चुका होऊ शकतात. अशावेळी कुटुंबाने तिला समजून घेऊन चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो. पण चूक व निष्काळजीपणा यामध्ये खूप फरक असतो, सध्या अशाच एक निष्काळजी प्रकारची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. एका आईने आपल्याच पोटच्या बाळाला चक्क चालू ओव्हनमध्ये ठेवल्याचे समजतेय. एका महिन्याच्या निष्पाप बाळाचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. सदर घटना युनाइटेड स्टेट्समधील मिसुरी येथे घडली आहे. या महिलेने बाळाला ओव्हनमध्ये ठेवण्याचं सांगितलेलं कारण हे आणखीनच थक्क करणारं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी नेमकं काय घडलं?

डेली मेलने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, झारियाच्या आजोबांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी दुपारी १ वाजता थॉमसने फोन करून घरी बोलवले होते. बाळाच्या बाबत काहीतरी चुकीचं घडलंय आणि तुम्ही लगेच घरी यायला हवं असं ती कॉलवर म्हणाली होती. घरी परतल्यावर धुराचा वास येत होता. जेव्हा झारीयाच्या पाळण्यात पहिले तेव्हा तिच्या शरीरावर भाजल्याच्या जखमा दिसून आल्या एवढंच नाही तर तिला घातलेला डायपर व कपडे सुद्धा वितळून शरीरावर चिकटले होते. बाजूला एक ब्लॅंकेट सुद्धा होते.

दुसरीकडे थॉमसच्या मैत्रिणीने डेली मेलला सांगितले की, “थॉमसची मानसिक स्थिती उत्तम नव्हती, ती अनेकदा लहान मुलांप्रमाणेच विचार करायची आणि वागायची. यामुळेही कदाचित तिने असं काहीतरी केलं असावं. झारीया खूप गोड मुलगी होती, नेहमी हसत असायची. ” पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी पोहोचल्यावर झारीया त्यांना घरात एका कार सीट मध्ये आढळून आली होती.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, या बाळाला आपत्कालीन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले होते पण भीषणरित्या भाजलेला हा एक महिन्याचा चिमुकला जीव श्वासही घेऊ शकत नव्हता. बाळाला मृत घोषित करण्यात आल्यावर अगदी पोलिसांसह उपस्थितांपैकी कुणालाच या घटनेवर विश्वास बसत नव्हता.

हे हा वाचा<< विजय सेतुपतीच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलाने केलेल्या मारहाणीत मृत्यू; मद्यधुंद लेकाला पोलिसांकडून अटक

बाळाला ओव्हनमध्ये ठेवलं तरी का?

फॉक्स 4 च्या वृत्तानुसार, थॉमसने सांगितले होते की, ती झारीयाला झोपवण्यासाठी (क्रिब) पाळण्यात ठेवायला जात होती, गडबडीत असल्याने तिने चुकून पाळण्याच्या ऐवजी बाळाला ओव्हनमध्ये ठेवले. जॅक्सन काउंटीचे वकील जीन पीटर्स बेकर यांनी याबाबत द न्यूयॉर्क पोस्टला माहिती देत सांगितले की, “थॉमसवर (आई) मुलाच्या हत्येचा आरोप आहे, आम्ही सगळेच या प्रकरणानंतर हादरून गेलो आहोत. या भयानक स्थितीत आता कायदाच योग्य न्याय करू शकेल, असा आमचा विश्वास आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 year old mother burns baby to death inside oven after claiming she mistook it for a crib jhula crime news today shocking incident svs
First published on: 11-02-2024 at 13:21 IST