नवनिर्वाचित खासदारांना अधिकृतरित्या खासदार निवास उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २६५ माजी खासदारांना १८ जून पर्यंत घरे रिकामी करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयातून देण्यात आले आहेत.
निर्धारित नियमांनुसार माजी खासदारांना आपले खासदार निवास नवनिर्वाचित खासदारांसाठी रिकामे करावे लागते हे सहाजिक आहे परंतु, यावेळी घरे खाली करावी लागणाऱया खासदारांचा आकडा लक्षणीय आहे.
तब्बल २६५ माजी खासदारांना आपली खासदार निवासस्थाने यावेळी रिकामी करावी लागणार आहेत. यावेळी एकूण ३२० नवनिर्वाचित खासदार आहेत. यामध्ये क्रेंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात घरे रिकामी करणे हे मोठे शर्थीचे काम आहे. एकदा घरे रिकामी झाली की, त्यानंतर नव्या खासदरांसाठी ती तयार करावी लागतील. यामध्ये दुरूस्ती, स्वच्छता आणि इतर गोष्टीही त्वरित कराव्या लागणार आहेत. असे ‘सीपीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱयांनी सांगितले