scorecardresearch

चीनमध्ये बसला भीषण अपघात; २७ प्रवासी ठार, २० जण जखमी

महामार्गावरील प्रवासादरम्यान बस अचानक उलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये ४७ जण प्रवास करत होते

चीनमध्ये बसला भीषण अपघात; २७ प्रवासी ठार, २० जण जखमी
(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

China Bus Accident: चीनच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये रविवारी एका बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या वर्षातील चीनमधील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ग्रामीण गुईझोऊ प्रांतातील एका महामार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेत २० जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चीनकडून पुन्हा दहशतवाद्यांची पाठराखण, मुंबई हल्ल्याचा सुत्रधार साजिद मीरला काळ्या यादीत टाकण्यास दर्शवला विरोध

महामार्गावरील प्रवासादरम्यान बस अचानक उलटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या बसमध्ये ४७ जण प्रवास करत होते. गुईझोऊ हा चीनमधील अत्यंत मागास आणि डोंगराळ भाग आहे. अल्पसंख्याक समाजातील लोक याठिकाणी मोठ्या संख्येने राहतात. जूनमध्ये याच भागात ट्रेन रुळावरुन घसरल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता बसला अपघात झाला आहे. दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात चीनमध्ये विमान अपघातात १३२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अनेक दशकातील हा चीनमधील सर्वात भयानक विमान अपघात होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 27 killed in bus accident at guizhou province in china rvs

ताज्या बातम्या