उद्योगक्षेत्रातील माजी मध्यस्थ नीरा राडिया यांना टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांच्यासमवेत टाटा समूहाच्या कामासाठी भेटलो असल्याची कबुली माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी सोमवारी दिली. मात्र राडिया यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केल्याच्या वृत्ताचा राजा यांनी स्पष्ट इन्कार केला.
रतन टाटा यांच्यासमवेत आपण राडिया यांची एक-दोन वेळा भेट घेतली. त्यानंतरही आपण त्यांना पर्यावरण आणि दूरसंचार मंत्रालयात भेटलो, असे राजा यांनी विशेष सीबीआय न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांच्यासमोर सांगितले.
राजा हे टूजी घोटाळ्यातील आरोपी असून त्यांनी स्वत:चा बचाव करताना साक्षीदार म्हणून या बाबी स्पष्ट केल्या. या दोन्ही मंत्रालयांचे मंत्री म्हणून राडिया आपल्याला भेटल्या. टाटा समूहाच्या कामानिमित्त त्यांनी आपली भेट घेतली. रतन टाटा यांच्यासमवेत त्या एकदा आपल्या निवासस्थानीही भेटण्यास आल्या होत्या, असेही राजा यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
राडिया यांची भेट घेतली- ए. राजा
उद्योगक्षेत्रातील माजी मध्यस्थ नीरा राडिया यांना टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांच्यासमवेत टाटा समूहाच्या कामासाठी भेटलो असल्याची कबुली माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी सोमवारी दिली.
First published on: 08-07-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2g case a raja accepts meeting niira radia at his residence