उत्तर प्रदेशात कारागृहात गोळीबार, ३ कैदी ठार

अन्य पाच कैद्यांवर रिव्हॉल्व्हर रोखले आणि त्यांना ठार करण्याची धमकी दिली.

(संग्रहित छायाचित्र)
चित्रकूट : येथील रगौली जिल्हा कारागृहात झालेल्या चकमकीत गोळीबारामुळे तीन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक कैदी  कारागृहातील अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या गोळीबारात ठार झाला. त्यापूर्वी या कैद्याने अन्य दोन कैद्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती, असे तुरुंगाधिकारी एस. पी. त्रिपाठी यांनी सांगितले. गोळीबारात ठार झालेल्या कैद्यांची नावे अंशू दीक्षित, मेराझुद्दीन ऊर्फ मेराज अली आणि मुकीम काला अशी आहेत. कैद्यांमध्ये भांडण झाले त्यावेळी ते सोडविण्यासाठी एक अधिकारी तेथे गेला असता दीक्षित याने कारागृहातील एका कर्मचाऱ्याकडील रिव्हॉल्व्हर खेचून घेतले. त्यानंतर दीक्षित याने अली आणि काला यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर त्याने अन्य पाच कैद्यांवर रिव्हॉल्व्हर रोखले आणि त्यांना ठार करण्याची धमकी दिली. त्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या गोळीबारात दीक्षित ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काला याच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 3 inmates killed in uttar pradesh jail shooting akp