scorecardresearch

सरबजितवरील हल्लाप्रकरणी तीन तुरुंगाधिकारी निलंबित

भारतीय नागरिक असलेल्या सरबजित सिंग या कैद्याचा पाकिस्तानातील लाहोर येथे कोट लखपत तुरुंगात झालेल्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर एक आठवडय़ाने पाकिस्तानने हल्ल्याची घटना जेथे घडली त्या तुरुंगाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांनी तीन अधिकाऱ्यांना कोट लखपत तुरुंगात सरबजितच्या सुरक्षेत कसूर केल्याच्या आरोपाखाली निलंबित केले.

सरबजितवरील हल्लाप्रकरणी तीन तुरुंगाधिकारी निलंबित

भारतीय नागरिक असलेल्या सरबजित सिंग या कैद्याचा पाकिस्तानातील लाहोर येथे कोट लखपत तुरुंगात झालेल्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर एक आठवडय़ाने पाकिस्तानने हल्ल्याची घटना जेथे घडली त्या तुरुंगाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांनी तीन अधिकाऱ्यांना कोट लखपत तुरुंगात सरबजितच्या सुरक्षेत कसूर केल्याच्या आरोपाखाली निलंबित केले. त्यात या तुरुंगाचे अधीक्षक मोहसिन रफीक, अतिरिक्त अधीक्षक इशतियाक गिल व उप अधीक्षक गुलाम सरवर सुमरा यांचा समावेश आहे, असे अधिकृत सूत्रांनी पीटीआयला सांगितले. त्याच्या जागी कमरान अंजुम यांना अधीक्षक, रझा महमूग झेमान यांना अतिरिक्त अधीक्षक तर नूर हसन यांना उपअधीक्षक नेमण्यात आले आहे.
सरबजित सिंग याचा या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मृत्यू झाला. त्याच्यावर २६ एप्रिलला कोट लखपत तुरुंगात प्राणघातक हल्ला झाला होता. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन कैद्यांवर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरबजित सिंग याला पंजाब प्रांतात १९९०मध्ये झालेल्या स्फोटात १४ जण मरण पावल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते व त्याला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-05-2013 at 12:16 IST

संबंधित बातम्या