श्रद्धा वालकर हत्याप्रकरण ताजं असताना निक्की यादव हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. २५ वर्षीय तरुणी निक्की यादवला प्रियकर साहिल गेहलोतने गळा आवळून खून केला आहे. नराधम आरोपीनं निक्कीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह आपल्या मालकीच्या एका फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. हत्येचं हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोत याला अटक केली आहे.

अटकेनंतर आरोपी साहिलने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. आरोपी साहिल गेहलोत आणि मृत निक्की यादव केवळ ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत नव्हते. तर दोघांनी २०२० मध्ये लग्नही केलं होतं, याबाबतची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपी गेहलोत दुसरं लग्न करू इच्छित होता, पण निक्कीचा दुसऱ्या लग्नाला विरोध होता. यातूनच आरोपीनं मोबाईल चार्जिंग लावायच्या केबलच्या सहाय्याने निक्कीचा गळा आवळला. यामध्ये निक्कीचा दुर्दैवी अंत झाला.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

या घटनेची अधिक माहिती देताना स्पेशल सीपी रवींदर यादव यांनी सांगितलं की, आरोपी साहिल आणि निक्कीचे २०२० मध्ये आर्य समाजाच्या मंदिरात लग्न झालं होतं. पण, साहिलच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी साहिलचा दुसऱ्या मुलीशी विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या आदल्या दिवशी ही बाब निक्कीला कळाली. यातून साहिल आणि निक्कीचे जोरदार भांडणही झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर साहिलने मोबाईल चार्जिंग केबलने निक्कीचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपीनं तिचा मृतदेह स्वत:च्या ढाब्यातील फ्रीजमध्ये ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी साहिलचे वडील, दोन भाऊ आणि दोन मित्रांना अटक केली आहे, याबाबतची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

असा आहे संपूर्ण घटनाक्रम

१. निक्की यादव (२५) हिने ९ फेब्रुवारी रोजी साहिलला फोन केला होता. तिला त्याच्या साखरपुड्याची माहिती मिळाली होती. निक्कीपासून लपवून त्याने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केला होता. निक्कीला अंधारात ठेवून तो पळून जाणार होता.

२. त्याच दिवशी रात्री साहिल निक्कीच्या फ्लॅटवर आला आणि निकीला बाहेर घेऊन गेला. दोघेही साहिलच्या चुलत भावाच्या कारमधून बाहेर गेले. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.

३. साहिल आणि निक्की रात्री निजामुद्दीन आणि आनंद विहारसह अनेक ठिकाणी फिरले.

४. साहिल आणि निक्की रात्रभर कारने फिरत होते. फिरता फिरता दोघेही शहरातून पळून जाण्याचं प्लॅनिंग देखील करत होते. त्याचदरम्यान, साहिलला त्याच्या घरून फोन येऊ लागले. साहिलचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. साहिल अशा वेळी रात्रभर घरी नसल्याने चिंतेने त्याच्या घरचे त्याला फोन करत होते. दरम्यान, कारमध्ये साहिल आणि निक्कीचं भांडण झालं आणि त्याने मोबाईलच्या चार्जिंग केबलने निक्कीचा गळा आवळला.

५. निक्कीची हत्या केल्यानंतर साहिल कार वेगाने पळवू लागला. काश्मीरी गेटपासून नजफगडपर्यंत ४० किमी अंतर त्याने न थांबता कार चालवली. संपूर्ण प्रवासात निक्कीचा मृतदेह कारमध्ये त्याच्या शेजारच्या सीटवर सीट बेल्टने बांधलेल्या अवस्थेत होता.

६. साहिल कार घेऊन त्याच्या ढाब्यावर गेला. तिथे कार उभी करून निक्कीचा मृतदेह त्याने कारच्या बूटमध्ये (डिक्कीमध्ये) हलवला.

७. निक्कीचा मृतदेह कारमध्ये ठेवून तो त्याच्या घरी मडोठी या गावी गेला आणि त्याच्या लग्नसोहळ्याच्या तयारीत सहभागी झाला.

८. लग्न पार पडल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता साहिल त्याच्या नवविवाहित पत्नीसह त्याच्या गावी गेला.

९. त्या रात्री सर्वजण झोपल्यानंतर साहिल घराबाहेर पडला. कार घेऊन तो ढाब्यावर गेला. तिथे गेल्यावर त्याने कारच्या डिक्कीमधला मृतदेह ढाब्यातल्या फ्रीजमध्ये हलवला.

१०. त्यानंतर साहिलने निक्कीचा फोन घेतला, त्यातले दोघांचे चॅट्स आणि कॉल्स डिलीट केले आणि फोन बंद केला.