बिहारात विषाक्त दारूचे ३१ बळी

बिहारमधील विरोधी पक्षेनेते तेजस्वी यादव यांनी या मृत्यूंसाठी नितीश कुमार सरकारला जबाबदार धरले आहे.

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये गेल्या २४ तासांत ३१ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. यात गोपालगंज जिल्ह्यात २० तर बेतिया जिल्ह्यात ११ जणांचा समावेश आहे. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधीच गेल्या आठवड्यात मुझफ्फरपूरमध्येही मद्यपानामुळे ६ जणांना जीव गमवावा लागला होता.

बिहारमधील विरोधी पक्षेनेते तेजस्वी यादव यांनी या मृत्यूंसाठी नितीश कुमार सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये दिवाळीच्या दिवशी विषारी दारूमुळे ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू सरकारमुळे झाला आहे. कुणाच्या तरी लहरीपणामुळे बिहारमध्ये फक्त कागदोपत्रीच दारूबंदी आहे. येथे बंदी असूनही दारूविक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. आरजेडी नेते मनोज झा यांनीही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

 बिहारमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, २०१६ पासून आम्ही दारूंबदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. बरेच लोक दारू बंदीच्या बाजूने आहेत. मद्यमान करू नका, असे आवाहनही केले आहे.

पोलीस कर्मचारी निलंबित

अवैध धंदे रोखण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मोहम्मदपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आनंद कुमार म्हणाले, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील तीन गावांत मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला अशा मोहम्मदपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 31 death victims of poisonous liquor in bihar akp

ताज्या बातम्या