काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीर पंडितांच्या पलायन आणि हत्याकांडानंतर तब्बल ३१ वर्षांनी सतीश टिक्कू यांच्या कुटुंबियांनी फारुख अहमद दार म्हणजेच बिट्टा कराटेविरोधात श्रीनगर न्यायालयात धाव घेतली आहे. सतीश हे काश्मिरी पंडितांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेले पहिले व्यक्ती होते. ३० मार्च रोजी सतीश यांच्या कुटुंबियांकडून न्यायालयामध्ये बिट्टा कराटेविरोधातील प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आलीय. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचे पलायन आणि हत्याकांड चर्चेत असतानाच ही मागणी करण्यात आलीय.

बिट्टा कराटे हा पाकिस्तानने फूस दिल्याने काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्याची अंमलबजावणी करणार्‍यांपैकी एक होता. सध्या तो तुरुंगाबाहेर असून मुक्तपणे जगत आहे. कराटे हा जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) या काश्मिरी पंडितांची हत्या करण्यासाठी नेतृत्व करणाऱ्या संघटनेचा प्रमुख आहे.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

१९९१ च्या इंडिया टुडेच्या मुलाखतीमध्ये बिट्टा कराटेने, “२० पेक्षा अधिक” काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचं किंवा ‘३० अथवा ४०’ पंडितांची हत्या केल्याचं म्हटलं होतं. हत्याकांडामध्ये आपण सहभागी होतो असंही तो म्हणाला होता. हा व्हिडीओ ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशानंतर सोशल मीडियावर फार व्हायरल झाला होता.

बिट्टा कराटाने एका मुलाखतीमध्येच आपण पहिल्यांदा ज्याची हत्या केली त्या काश्मिरी पंडिताचं नाव सतीश टीकू होतं असं म्हटलंय. श्रीनगर सत्र न्यायालयाने सतीश यांच्या कुटुंबियांच्या वकिलांना १६ एप्रिलपर्यंत याचिकेसंदर्भातील मागणीचे कागपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे.