निमलष्करी दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण

निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत

निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केली. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारोहात बोलत होते. सध्याच्या घडीला सुरक्षा दलांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त ५.०४ टक्के इतके असून भविष्यात हा आकडा एक तृतीयांश इतका झाला पाहिजे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने स्वत:च्या कक्षा विस्तारण्याची गरज असून यापुढे त्यांनी सायबर क्राईमच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे सीआयएसएफ हे पहिले दल आहे. सीआयएसएफमधील जवांनाची संख्या सध्या १.४७ लाख असून ती भविष्यात दोन लाख करण्याचा सरकारचा इरादा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 33 reservation for women in paramilitary forces rajnath singh says

ताज्या बातम्या