मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. संबंधित बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात एकूण ३९ प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित सर्वजण भोपाळमधील ‘कार्यकर्ता महाकुंभ’ कार्यक्रमासाठी जात होते. याठिकाणी आज (सोमवार, २५ सप्टेंबर) पंतप्रधान मोदी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
खरगोन जिल्ह्यातील कासारवाडजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या बसमधून खापरजामली, रुपगढ आणि राय सागर येथील भाजपा कार्यकर्ते प्रवास करत होते.




खरं तर, जनसंघाचे सहसंस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये ‘कार्यकर्ता महाकुंभ’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. त्यामुळे राज्यभरातून भाजपा कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला.