टी -२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने हा सामना गमावताच भारतात काही ठिकाणी पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला. एवढेच नाही तर फटाकेही फोडण्यात आले. मात्र उत्तर प्रदेशातील योगी सरकारने देशाच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. 

टी -२० क्रिकेट विश्वचषक सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तान जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशात पाकीस्तानच्या समर्थानात घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जिल्ह्यांतील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान सामना २४ ऑक्टोबर रोजी झाला होता.

दुसरीकडे राजस्थानच्या उदयपूरमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या महिला शिक्षिका नफीसाला अटारी येथून अटक करण्यात आली आहे. ज्याने सामन्याच्या आनंदावर आपल्या मोबाईलवर स्टेटसवर पाकिस्तानच्या विजयाच्या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, आता आम्ही जिंकलो. त्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांना शिक्षक पदावरून बडतर्फ केले.