दिल्लीत पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार; अक्षरधाम मंदिराजवळची घटना

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून शोध मोहीम

दिल्लीतील अक्षरधाम मंदिरासमोरील या परिसरात गोळीबाराची घटना घडली.

एका चारचाकीतून जाणाऱ्या चौघांनी पोलिसांवर गोळाबार केल्याची घटना समोर आली आहे. अक्षरधाम मंदिरांसमोर ही घटना घडली असून, त्यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित फरार झाले आहेत. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

चार आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून जात होते. दिल्ली पोलिसांच्या पथकाने अक्षरधाम मंदिराजवळ त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर गाडीतील सशस्त्रधारी संशयितांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबार करताच आरोपी फरार झाले. आरोपी गीता कॉलनीच्या दिशेने बेपत्ता झाले.

दरम्यान, या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 4 unidentified fired at police team near akshardham temple in new delhi bmh

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या