चीनमध्ये दरडी कोसळून ४० जण गाडले गेले

चीनच्या नैर्ऋत्येकडील सिचुआन प्रांतात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून त्याखाली ३० ते ४० जण गाडले गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

चीनच्या नैर्ऋत्येकडील सिचुआन प्रांतात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून त्याखाली ३० ते ४० जण गाडले गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
या घटनेची खबर मिळताच मदतकार्य पथकाची पहिली तुकडी तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली असून मदतकार्य वेगाने सुरू आहे. चीनच्या सिचुआन प्रांतात मुसळधार पावसामुळे सोमवारपासून तीन पूलही कोसळले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 40 people buried in landslides in china