छत्तीसगडमध्ये ४३ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण; राज्य सरकारकडून बक्षीस असलेल्या नक्षल्याचाही समावेश

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात बुधवारी नऊ महिला नक्षलवाद्यांसह एकूण ४३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

naxal-mednew
(प्रातिनिधीक छायाचित्र)

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात बुधवारी नऊ महिला नक्षलवाद्यांसह एकूण ४३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यातील दहा गावांतील ४३ नक्षलवादी सुकमा शहरातील वरिष्ठ पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि आत्मसमर्पण केले, अशी माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी पीटीआयला दिली. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पूना नर्कोम मोहिमेअंतर्गत सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

जिल्ह्यात सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने नक्षल निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. ज्या अंतर्गत पोलीस दल सुकमाच्या अंतर्गत मोहिमेपर्यंत पोहोचून जिल्हा प्रशासनाच्या पुनर्वसन धोरणाला प्रोत्साहन देत आहे. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून द्यावा, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. आत्मसमर्पण केलेला एक नक्षलवादी पोडियामी लक्ष्मणवर छत्तीसगड सरकारने १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे एसपी सुनील शर्मा म्हणाले की, “शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांनी शासन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे वचन घेतले आहे. नक्षलवादी पोडियामी लक्ष्मणवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सध्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. तर पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकाला इतर सुविधा दिल्या जातील.”

दरम्यान, सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसोबत बसून जेवण केले. यावेळी सीआरपीएफचे अधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पूना नर्कोम मोहिमेच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील सुमारे २५ ते ३० गावांमधून एकूण १७६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, असे शर्मा म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 43 naxals surrender in sukma district of chhattisgarh hrc

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या