नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आग्नेय आशियासाठी मोठय़ा प्रमाणात करोना प्रतिबंधक लशींच्या मात्रा देण्यात आल्या असून भारताला ४८.९ कोटी लसमात्रा पुरवण्यात आल्या असल्याचे शुक्रवारी डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

करोना महासाथीच्या काळात या भागातील अनेक देश लसीकरण करून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे डब्ल्यूएचओच्या आग्नेय आशिया विभागीय संचालक  डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

६१.८५ कोटी लसमात्रा पुरवण्यात आल्या असून त्यातून १४.६० जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जून महिन्यातील मोहिमेत ४८.९० कोटी लसमात्रा भारताला पुरवण्यात आल्या. तर इंडोनेशियाला ७.१ कोटी आणि थायलंडला १.८० कोटी लसमात्रा पुरवण्यात आल्या आहेत. तर श्रीलंकेला १.३ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून त्यातून दर दिवशी ५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे, निवेदनात म्हटले आहे.