अमेरिकेतील अलास्कामध्ये दोन फ्लोट विमानाची (पाण्यामध्ये उतरण्यास सक्षम असणारे छोटे विमान) हवेत टक्कर होऊन अपघात झाला आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण बेपत्ता आहे. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

स्थानिक प्रसारमाध्यांच्या माहितीनुसार, फ्लोट विमानामध्ये पर्यटनासाठी आलेले रॉयल प्रिंसेस क्रूजचे प्रवाशी होते. त्यांना प्लोट विमानाने पर्यटनासाठी कराई भागात जायचे होते.

यूएस फेडरल अविएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार, कून केव जावळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर आणि द हेविलँड ऑटर डीसी-3 ही दोन प्लोट विमानांची टक्कर झाली. या अपघाताचे कारण अद्याप समजले नाही. एका विमानात सहा आणि दुसऱ्या विमानात ११ प्रवाशी यात्रा करत होते. एफएएनुसार, दुर्घटनेवेळी दोन्ही प्लोट विमाने एटीसीच्या ( एयरक्राफ्ट एयर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्कात नव्हती. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही मात्र, ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचा तपास करत आहे.