पोटनिवडणुकांत ५० ते ८० टक्के मतदान

राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला येथून प्रमुख उमेदवार आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

देशभरातील तीन लोकसभा तसेच २९ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ५० ते ८० टक्के मतदान झाले. १३ राज्यांमध्ये या जागा आहेत. मतदान शांततेत पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हरयाणातील एलेनाबाद विधानसभा मतदारसंघात ८० टक्के मतदान झाले. राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला येथून प्रमुख उमेदवार आहेत. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात ७५.५१ टक्के मतदान झाले. येथे शिवसेनेकडून दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर निवडणूक लढवत आहेत. येथे भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले. २ नोव्हेंबरला सर्व ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 50 to 80 percent turnout in by elections akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या