scorecardresearch

धक्कादायक! ५४ दिवसांच्या मुलीला वडिलांकडूनच अमानुष मारहाण, रुग्णालयात जगण्यासाठी संघर्ष सुरु

निर्दयी पित्यामुळे ५४ दिवसांच्या मुलीचा रुग्णालयात आयुष्याशी संघर्ष

संग्रहित
केरळमध्ये एका निर्दयी पित्याने आपल्याच ५४ दिवसांच्या बाळाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील एर्नाकुलम येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, १९ जून रोजी ही घटना घडली आहे. बाळाला एका खासगी रुग्णायात दाखल करण्यात आलं असून आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती सध्या गंभीर आहे.

४० वर्षीय आरोपी पिता शज्जू थॉमस याने आपली मुलगी बेडवरुन खाली पडल्याचा दावा केला होता. पण डॉक्टरांना मुलीची प्रकृती पाहून संशय आला. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थॉमस याने दारुच्या नशेत मुलीला मारहाण केली आणि बेडवर फेकून दिलं.

पोलिसांनी मुलीच्या आईचा जबाबदेखील नोंदवला असून तिनेही मारहाण झाल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपी थॉमसला अटक केली असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 54 day old infant assaulted by father in kerala sgy

ताज्या बातम्या