5G service launched country Unveiling system Prime Minister narendra modi ysh 95 | Loksatta

देशात ‘५जी’ सेवा सुरू; संपूर्ण स्वदेशी प्रणालीचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘५जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले.

देशात ‘५जी’ सेवा सुरू; संपूर्ण स्वदेशी प्रणालीचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
देशात ‘५जी’ सेवा सुरू; संपूर्ण स्वदेशी प्रणालीचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

पीटीआय, नवी दिल्ली : देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘५जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे. विशेष म्हणजे ही ‘५जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली. भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘५जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. ‘‘या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘‘आज १३० कोटी भारतीयांना ५जीच्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. यामुळे अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे मोदी म्हणाले.

‘५जी’ प्रणालीचा वापर करून पंतप्रधानांनी युरोपमध्ये गाडी चालवली. गाडी स्वीडनमध्ये होती, तर तिचे नियंत्रण ‘आयएमसी’मधील एरिक्सन कंपनीच्या मंडपात होते. पंतप्रधानांनी तिथे बसून हजारो किलोमीटरवर असलेली गाडी चालवली. यानिमित्ताने ‘५जी’ प्रणालीच्या वेगाची चाचणी घेतली गेली.

उद्योगजगताकडून स्वागत

‘५जी’ सेवेच्या रूपाने आपण सर्वसमावेशक डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया ‘सीआयआय’चे अध्यक्ष संजीव बजाज यांनी व्यक्त केली. तर अतिवेगवान इंटरनेट शिक्षण, आरोग्य आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे आहे, असे ‘असोचेम’चे महासचिव दीपक सूद म्हणाले. ‘फिक्की’चे अध्यक्ष संजीव मेहता यांनी, ‘‘आता देशात व्यवसाय करणे आणि जगणे सोपे होणार आहे,’’ अस सांगितले.

मोबाइलमध्ये कधी?

  • ‘भारती-एअरटेल’ने मुंबई, दिल्ली, बंगळूरु आणि वाराणसीसह आठ शहरांमध्ये लगेच सेवा सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले.
  • आघाडीच्या रिलायन्स ‘जिओ’ने चार महानगरांमध्ये याच महिन्यात सेवा सुरू होईल, असे जाहीर केले. ‘व्होडाफोन-आयडिया’ने मात्र अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.
  • ‘जिओ’ने डिसेंबर २०२३ पर्यंत, तर ‘एअरटेल’ने मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देश ‘५जी’च्या जाळय़ात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले.

२जी, ३जी आणि ४जी प्रणालींसाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत होते. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ५जी प्रणाली विकसित करून भारताने इतिहास घडवला आहे. २जीची नियत आणि ५जीची नियत यांच्यात हाच फरक आहे.

    – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मोबाइल क्रांती

श्रेणी    २०१४   २०२२

मोबाइल कारखाने    २   २००

मोबाईल वापरकर्ते    ६ कोटी ८० कोटी

इंटरनेट शुल्क (प्रति जीबी)    ३००    १०

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शहर स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरा; इंदूर सहाव्यांदा प्रथम, सुरत, नवी मुंबई अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी

संबंधित बातम्या

Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
अग्निवीरांना सवलती; असंतोष शमवण्यासाठी संरक्षण मंत्रालय, निमलष्करी दलांत १० टक्के आरक्षण  
राजस्थान काँग्रेसमध्ये एकजूट, पक्षांतर्गत वाद निव्वळ कथा ;पायलट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती