उत्तर भारत, जम्मू काश्मीरसह पाकिस्तानमध्ये आज दुपारी चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. ६.८ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. भूकंपाचे धक्के तब्बल पाच मिनिटांपर्यंत जाणवले. या भूकंपामुळे जम्मू काश्‍मीरसहितच एकंदरच उत्तर भारतामधील जनजीवन बाधित झाले. भूकंपाच्या धक्क्यामुळे दिल्लीतील मेट्रो सेवा तात्पुरती थांबविण्यात आली होती. पण आता ही सेवा पूर्ववत झाली आहे.
अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवर हिंदुकूश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानलाही भूकंपाचे धक्के बसले. पाकिस्तानसह दिल्ली, हिमाचल प्रदेश, श्रीनगर, उत्तराखंड, नॉयडा, गुरगावला भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 8 earthquake shakes afghanistan tremors felt in north india
First published on: 10-04-2016 at 17:10 IST