करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहा फुटांचं अंतर पुरेसं नाही: रिपोर्ट

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की संक्रमित व्यक्ती जर मास्कविना बोलत असेल तर त्याच्या बोलण्यातील विषाणूंनी भरलेले कण २ मीटरच्या क्षेत्रात अवघ्या एका मिनिटात प्रसारीत होऊ शकतात.

Corona
(प्रातिनिधीक छायाचित्र)

दोन मीटरचे म्हणजेच साडेसहा फुटांचे शारीरिक अंतर घरात व्हायरस वाहून नेणाऱ्या एरोसॉल्सचे प्रसारण रोखण्यासाठी पुरेसे असू शकत नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, श्वासोच्छ्वासातून बाहेर पडणाऱ्या एरोसोलच्या मानवी संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी केवळ शारीरिक अंतर पुरेसे नाही. त्यामुळे मास्किंग आणि हवा खेळती राहील, अशी व्यवस्था असणं आवश्यक आहे.

हे संशोधन करताना संशोधकांनी एका जागेवर किती प्रमाणात हवा खेळती राहते याचा दर, विविध वायुवीजन धोरणांशी संबंधित इनडोअर एअरफ्लो पॅटर्न आणि बोलताना तसेच श्वासोच्छवासादरम्यान किती प्रमाणात ऐरोसोल बाहेर पडतात त्याचं प्रमाण, या तीन घटकांची तपासणी केली. यावेळी त्यांनी ट्रेसर गॅसच्या वाहतुकीची देखील तुलना केली. विशेषत: एअर-टाइट सिस्टीममध्ये गळती तपासण्यासाठी आणि मानवी श्वसन एरोसॉल्सचे आकारमान एक ते १० मायक्रोमीटरपर्यंत असतात. या श्रेणीतील एरोसोल एस-सीओव्ही -२ वाहून नेऊ शकतात. हा विषाणू करोना होण्यास कारणीभूत आहे.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे लेखक आणि डॉक्टरेटचे अभ्यास करणारे जेन पे म्हणाले, की “आम्ही संक्रमित लोकांकडून इमारतींमध्ये सोडलेल्या व्हायरसयुक्त कणांच्या हवेतील प्रसाराचा शोध घेणार आहोत. तसेच “आम्ही व्हायरसच्या इनडोअर एक्सपोजरसाठी नियंत्रण धोरण म्हणून वेंटिलेशन आणि शारीरिक अंतर बांधण्याच्या परिणामांची तपासणी केली,” असं पे म्हणाले.

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की संक्रमित व्यक्ती जर मास्कविना बोलत असेल तर त्याच्या बोलण्यातील विषाणूंनी भरलेले कण २ मीटरच्या क्षेत्रात अवघ्या एका मिनिटात प्रसारीत होऊ शकतात. पेन स्टेटचे लेखक आणि सहयोगी प्राध्यापक डोंग्युन रिम म्हणाले, “ज्या ठिकाणी हवा पुरेशी खेळती राहत नाही, त्याठिकाणी हे प्रमाण जास्त आढळतं.”

संशोधकांना असे आढळले की हवा खेळती नसेल अशा खोल्यांमध्ये एरोसोल जास्त वेगाने प्रसारीत होतात. जिथे ताजी हवा सतत मजल्यावरून वाहते आणि जुन्या हवेला कमाल मर्यादेजवळ एक्झॉस्ट व्हेंटकडे ढकलते. बहुतेक घरांमध्ये हेच वेंटिलेशन सिस्टम आढळते. त्यामुळे एरोसोलचे मानवी श्वासोच्छवासाच्या झोनमध्ये प्रसारीत होण्याचं प्रमाण सात पटीने जास्त आहे, असंही ते म्हणाले. अनेक व्यावसायिक इमारती मिक्स-मोड प्रणाली वापरतात. जे बाहेरील हवेचा अंतर्भागातील हवा सौम्य करण्यासाठी अंतर्भूत करतात आणि परिणामी हवेचे एकत्रीकरण चांगले होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. “हे आश्चर्यकारक आहे. मात्र, कार्यालयीन वातावरणापेक्षा घरातील वातावरणासाठी हवेतून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असू शकते,” असेही रिम म्हणाले.

दरम्यान, घरात यांत्रिक पंखे चालवणे आणि एअर क्लीनर संक्रमणाची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतात, असेही रिम म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 6 feet distance may not be enough to prevent virus spread indoors according to study hrc