scorecardresearch

Premium

Delhi Earthquake: दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO

Delhi Earthquake News in Marathi : भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली आहे. याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Earthquake in Delhi Today News in Marathi earthquake in delhi
दिल्ली-एनसीआरमधील भूकंप (फोटो-एएनआय)

Earthquake in Delhi NCR: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर आज (मंगळवार, ३ ऑक्टोबर) नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर ६.२ रिश्टर स्केलचा सलग दुसरा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या परिसरात अनेक वेळ धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

birthday boy got into trouble after cutting cake on the middle of the road police arrested
मित्राचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात! रस्त्याच्या मधोमध कापत होते केक; पोलिसांनी सर्वांनाच दिले असे ‘रिटर्न गिफ्ट’
teens deliberately kills ex-police officer
अल्पवयीन मुलांनी मुद्दाम घेतला सायकलस्वाराचा जीव, चोरीची कार अंगावर घातली, अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ VIRAL
A young man's stunts in a running train Thrilling video from Mumbai local is going viral
जीवघेणा खेळ! धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
famous comedian sunil grover washing clothes video goes viral on social media instagram netizens reaction
सुनील ग्रोवरचा रस्त्याच्या कडेला कपडे धुतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच

यामध्ये घरांची पडझड झाल्याची अथवा जिवीतहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

उत्तर भारतातील विविध भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर उत्तराखंडच्या देहरादून येथील लोक इमारतींमधून बाहेर आले. यावेळी लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर ७५ मधील भूकंपाचा व्हिडीओ

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 6 point 2 magnitude earthquake in nepal tremors in north india including delhi video rmm

First published on: 03-10-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×