धक्कादायकः ६५ वर्षांच्या वृद्धेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार

१५ वर्षांच्या मुलाची रवानगी बालसुधारगृहात

rape case
(प्रातिनिधिक छायाचित्र )

६५ वर्षांच्या वृद्धेवर एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समजते आहे. या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचेही समजते आहे. ६५ वर्षांच्या वृद्धेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार,  १५ वर्षांच्या मुलाने कथित बलात्कार आणि बळजबरी केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचे वडील एके ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करतात. तसेच जिथे ही घटना घडली त्या मोकळ्या जागेच्या शेजारच्या भागातच हा मुलगा राहतो असेही पीडितेने सांगितले. तर पीडित महिला इतरांच्या घरी घरकाम करून तिचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे समजते आहे.

पीडित महिला आंघोळ करत असताना हा मुलगा तिथे आला. त्याने तिच्यावर बळजबरी केली. तसेच तिने पोलिसांना किंवा कोणालाही काही सांगितले तर तुला इजा पोहचवेन अशीही धमकी दिली. मात्र घडलेल्या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या या महिलेने पोलीस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली. या सगळ्या प्रकाराचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. पीडित वृद्धेचा कबुली जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे. हे सगळे प्रकरण आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे ठेवण्यात येणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पीडित महिला मूळची छत्तीसगढ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती दिल्लीत वास्तव्य करते. सध्या एका एनजीओकडून तिचे समुपदेशन केले जाते आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या अनेक घटनांपैकी ही घटना पोलिसांनाही चक्रावून टाकणारी ठरली आहे. या घटनेची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यता येते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 65 year old woman raped by 15 years old boy in delhi

ताज्या बातम्या