पीटीआय, चंडीगड

जम्मू-काश्मीर ते पंजाबदरम्यान एक मालगाडी रविवारी चक्क चालकाशिवाय तब्बल ७० कि.मी धावली! या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथून पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका गावापर्यंत तब्बल ७० कि.मी. हून अधिक अंतर ही मालगाडी विनाचालक धावली. सकाळी ७.२५ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मालगाडीला दगडांनी भरलेल्या ५३ बोगी जोडलेल्या होत्या. रेल्वे पोलिसांनी माहिती दिली की या ट्रेनविषयी सूचना मिळाल्यानंतर जालंधर-पठाणकोट भागातील सर्व रेल्वे-रस्ते क्रॉसिंग बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता.

Western Railway, Cancels Mega Block, Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, Western Railway Cancels Mega Block, to stop Passenger Discomfort, mumbai local, mumbai news, marathi news,
डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
International Monetary Fund
विकास दराचे आठ टक्क्यांचे सातत्य २०४७ पर्यंत टिकेल; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक सुब्रमणियन यांचा दावा
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव

उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्याने प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितले की चालक बदलण्यासाठी ही मालगाडी जम्मूच्या कठुआ रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली होती. मात्र जम्मू-जालंधर भागातल्या उतारावर ही गाडी घसरू लागली. इंजिनमध्ये लोको पायलट आणि साहाय्यक पायलट नव्हते. मार्गात ट्रेनचा वेग वाढत गेला आणि अखेर पंजाबमधील बस्सी रेल्वे स्टेशनजवळ एक चढ आल्याने ट्रेन थांबली.ट्रेन वाळूच्या गोण्यांच्या साहाय्याने यशस्वीपणे थांबवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.